नवे चिंचपूर, जुने चिंचपूर येथील छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्यांचे जल्लोषात स्वागत

Foto
सिल्लोड (प्रतिनिधी)  नवे चिंचपूर व जुने चिंचपूर येथे उभारण्यात येत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यांचे सिल्लोड येथे स्वागत केले. या पुतळ्याचे आमदार अब्दुल सत्तार यांचे जनसंपर्क कार्यालय, शिवसेना भवन येथे आगमन होताच तालुका शिवसेनेच्या वतीने जल्लोषात स्वागत करण्यात आले. फटाक्यांची आतषबाजी व जयघोषाने परिसर दुमदुमून गेला होता.

याप्रसंगी नगराध्यक्ष अब्दुल समीर यांच्या हस्ते दोन्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी उपस्थित शिवभक्तांशी संवाद साधून नगराध्यक्ष अब्दुल समीर यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या. छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा आपल्या गावात उभारला जात असल्याबद्दल नवे चिंचपूर व जुने चिंचपूर येथील ग्रामस्थांचे यावेळी अभिनंदन करण्यात आले.

शिवाजी महाराजांचे शौर्य, पराक्रम, स्वराज्याची संकल्पना आणि सर्वधर्मसमभावाचा विचार समाजाला सदैव प्रेरणा देत राहील, असे प्रतिपादन यावेळी नगराध्यक्ष अब्दुल समीर यांनी व्यक्त केले. पुतळ्यांचे शिवसेना भवन येथे आगमन होताच शिवभक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. ङ्गजय भवानी, जय शिवाजीफ तसेच ङ्गछत्रपती शिवाजी महाराज की जयफ अशा जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.

फटाक्यांची आतषबाजी करत शिवभक्तांनी या ऐतिहासिक क्षणाचा उत्साहात आनंद साजरा केला. जि. प. सदस्य देविदास पालोदकर, शिवसेना उपजिल्हाप्रमुख किशोर अग्रवाल, जिल्हा संघटक सुदर्शन अग्रवाल, उपनगराध्यक्ष विठ्ठल सपकाळ, नगरसेवक सिद्धेश्वर आहेर, जितू आरके, अशोक बनसोड, महिला आघाडीच्या दुर्गाबाई पवार, सयाजीराव वाघ, संजय डमाळे, गणेश पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक नानासाहेब रहाटे, मारुती पा. वराडे, अजित पाटील, महेश पाटील यांच्यासह ग्रामस्थ विश्वास जंजाळ, गणेश बडक, विलास मस्के, जगन्नाथ मस्के, सुदाम जंजाळ, संतोष खाकरे, खाकरे, कदिर देशमुख, सोमीनाथ जंजाळ, शुभम जंजाळ, अजिनाथ शेळके, समाधान खाकरेसह आदी उपस्थित होते.